Home बड़ी खबरें सरकारच्या उदासिन धोरणाच्या निषेधार्थ राज्यभरातील पत्रकारांचे अन्नत्याग व आत्मक्लेष आंदोलन…

सरकारच्या उदासिन धोरणाच्या निषेधार्थ राज्यभरातील पत्रकारांचे अन्नत्याग व आत्मक्लेष आंदोलन…

415

मा. ना. श्री. उध्दवजी ठाकरे,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य, मुंबई

विषय :पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात सरकारच्या उदासिन धोरणाच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांचेसह राज्यभरातील पत्रकारांचे अन्नत्याग व आत्मक्लेष आंदोलन…

महोदय,

1) महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील पत्रकारांना तातडीने कोरोना प़तिबंधक लस द्यावी, 2) पत्रकारांसाठी ऑक्सीजन आणि व्हेटिलेटरची सोय असलेले बेड राखीव ठेवावेत, 3) पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून संबोधावे कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिली जावी 4) कोरोना निर्मूलन – जनजागृती करण्यासाठी प्रसंगिक जाहिरातीच्या माध्यमातून पत्रकारांना आर्थिक मदत करावे, 5) सर्व विभागातील माहिती कार्यलयासह वर्षापासून वर्तमान पत्रांची थकीत असलेली देयके ताबडतोब देण्यास कळवावे,  6) अधिस्वीकृती धारकच पत्रकार नव्हे तर सर्वच पत्रकारांना वृतसंकलन साठी परवानगी दयावी… या मागण्या आम्ही आपणाकडे सातत्यानं केल्या आहेत.. इ-मेल आंदोलनाच्या माध्यमातून एक हजार मेल पाठवून विषयाचे गांभीर्य आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला मात्र सरकारने पत्रकारांची कोणतीच मागणी पूर्ण केली नाही.. त्याची दखलही घेतली नाही.. उलटपक्षी अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी असलेली मुंबईतील लोकल प्रवासाची सुविधाही काढून घेतली.. या सर्वांमुळे माध्यम जगतात मोठा संताप आणि असंतोष आहे..

महोदय,
आपणास ज्ञात आहेच की, आजवर राज्यात सुमारे ५००० पत्रकार कोरोनाबाधित झाले असून १२२ पत्रकारांचे मृत्यू कोरोनानं झाले आहेत. जवळचे मित्र एकापाठोपाठ एक जात असल्याने पत्रकारांमध्ये भिती आणि चिंतेचे वातावरण आहे. अशा वातावरणात पत्रकारांना दिलासा मिळेल असा एकही निर्णय सरकार घेत नसल्याने आमच्यावर आत्मक्लेष करून घेण्याशिवाय अन्य काही मार्ग उरला नाही..

त्यामुळे आज महाराष्ट्र दिनी (1 मे) पत्रकारांचे नेते, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख एक दिवसाचे आत्मक्लेष आंदोलन करीत आहेत. बीड जिल्हयातील देवडी या गावी माणिकबाग येथे लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून दिवसभर अन्नत्याग करून हे आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्रातील सर्व पत्रकार आपआपल्या घरी बसून व दिवसभर अन्नत्याग करून एस.एम.देशमुख यांच्या आंदोलनास पाठिंबा देत आहेत. आपणास विनंती आहे की, पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन एस.एम.देशमुख यांच्या सारख्या ज्येष्ठ पत्रकारांसह राज्यातील पत्रकारांवर आत्मक्लेष आंदोलनाची वेळ पून्हा येणार नाही, याची काळजी घ्यावी ही विनंती.

कळावे,

आपले विनित,

अध्यक्ष, नरसिंह घोणे, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ