Home चंद्रपूर  आशा वर्कर वरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही.-कॉ.झोडगे यांचा इशारा.

आशा वर्कर वरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही.-कॉ.झोडगे यांचा इशारा.

110

 

चंद्रपूर :—राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत चंद्रपूर मनपा द्वारे आरोग्या चा कणा तसेच कोरोना योद्या म्हणून अत्यंत तुटपुंज्या मोबदल्यात अहोरात्र आशा वर्कर काम करतात .तरीपण त्यांच्या मासिक अहवालावर असमाधान कारक काम असल्याचा शेरा मारत झोन क्र.2 मधील 10 आशा वर्कर चे जून 2021 चे 1500 रू.मानधन हेतू परस्पर वैद्यकीय झोनल अधिकारी मॅडम यांनी देण्यास टाळाटाळ केल्याने आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी त्यांच्या कार्यालय समोर दि.1 सप्टेंबर ला तीव्र निदर्शने व घेराव आंदोलन करण्याची नोटीस दोन दिवसापूर्वी दिली होती.याचा धसका घेत सबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचे मानधन देण्याचे मान्य केल्याने आज तात्पुरते आंदोलन स्थगित करत ,एम.एस. ई. बी. वर्करस फेडरेशन सोसायटी सभागृहात मेळावा घेऊन त्यांच्या समस्या विषही चर्चा करण्यात आली. व संघटना मजबूत करून भविष्यात सरकार व प्रशासन यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी दिला. तसेच महानगर पालिका तरपे कोरोना काळात काम करताना आशा वर्कर ला मासिक चार हजार रु.देण्याचे आदेश काढले होते परंतु जानेवारी 2021 पासून त्यांचे थकीत 4000 रू. कोरोना भत्ता आजता गायत दिल्या गेला नाही या संबंधी संघटनेच्या वतीने आयुक्त ,जिल्हाधिकारी व पालक मंत्री विजयभाऊ वडेटीवार यांना वारंवार निवेदेन देण्यात आले परंतु आश्वासन शिवाय हातात काहीच मिळाले नाही तेव्हा येत्या 13 सप्टेंबर 2021 पासून महानगर पालिका कार्यालय समोर मुक्कामी ठिय्या आंदोलन करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.यावेळी
व्यासपीठावर कोलमाईन (WCL)संघटनेचे नेते कॉ.प्रदीप चीताडे,भद्रावती नगर परिषद चे माजी नगरसेवक कॉ.राजू गैनवार,चंद्रपूर शहर आशा संघटनेच्या सचिव प्रतिमा कायरकर, अधक्ष वैशाली जुपाका,संघटक सविता गठलेवार,प्रमिला बावणे, सुकेशनी शंभरकर,सुलोचना उराडे,सोनाली हजारे यांच्या सह शहरातील शेकडो आशा वर्कर उपस्थित होत्या.