Home चंद्रपूर  *सदभावना एकता मंच समाजाला दिशा देणारा ठरणार* – *आ. प्रतिभा धानोरकर*

*सदभावना एकता मंच समाजाला दिशा देणारा ठरणार* – *आ. प्रतिभा धानोरकर*

106

*वरोरा* – जाती-धर्मात गुरफटलेला समाज एकसंघ राहावा, या हेतूने प्रेरीत झालेल्या समविचारी लोकांनी सदभावना एकता मंचची स्थापना केली. हा मंच समाजाला दिशा देणारा ठरणार असल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी येथे व्यक्त केले. सदभावना चौकातील फलकाच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अहेतेशाम अली होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे उपस्थित होते.आ.धानोरकर पुढे म्हणाल्या की, विधायक कार्य करणाऱ्या मंचाचीच आज समाजाला गरज आहे. हा सदभावना एकता मंच त्यात खरा उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षस्थानावरून बोलतांना नगराध्यक्ष अहेतेशाम अली म्हणाले, आपलंही काहीतरी समाजाला देणं लागते. या उद्दात्त हेतूनेच सदभावना एकता मंच उदयास आला. हा मंच विविध समाजपयोगी कार्य करणार आहे. त्यामुळे सदैव त्यांच्या पाठीशी राहू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. जीवनात प्रत्येकानी सेवाभाव जपण्याचे भावनिक आवाहन नगराध्यक्ष अली यांनी यावेळी केले.मंचाचे पदाधिकारी नगरसेवक छोटूभाई शेख म्हणाले की, मंचच्या वतीने अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. भविष्यात शिक्षण, आरोग्य क्षेत्रात करण्याचा मंचाचा मानस आहे. तरुणांना योग्य दिशा मिळावी म्हणून सदभावना युवा एकता मंचाचीही निर्मिती करण्यात आली आहे. या दोन्ही मंचाचे वतीने शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक योगदान देण्यात येईल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. याप्रसंगी मंचाचे पदाधिकारी गोपाळ गुडधे, राजकुमार गिमेकर, गुरूदेव जुमडे, धनराज आसेकर, अरूण उमरे, मिनाज अली, प्रशांत झाडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. राजकुमार गिमेकर यांनी केले. आभार गुरूदेव जुमडे यांनी मानले.या कार्यक्रमाला प्रतिष्ठित व्यक्ती, विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर , सदभावना एकता युवा मंचचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.