माजरी।।
पळसगांव ते कुचना रोड अत्यंत दयनिय अवस्थेत असून त्याची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी डाॅ. अंकुश आगलावे , विदर्भ प्रदेश अध्यक्ष , केंद्रीय मानवाधिकार संगठन यांनी मा. जिल्हाधिकरी साहेबांना पत्रकाव्दारे केलेली आहे। भद्रावती तालुक्यातील पळसगांव ते कुचना अंदाजे 2 कि.मी रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झालेली आहे. या रस्त्यावर जागो-जागी मोठ-मोठे खड्डे पडलेले असून पावसाच्या पाण्याने खड्डयात पाणी साचलेले आहे. पायदळ चालणारे शेतकरी बांधव या चिखल व पाणी साचलेल्या रस्त्यातून वाट कष् काढावी हा प्रष्न उद्भवत आहे. तसेच दुचाकी व तीन चाकी वाहनांना वाहतुक करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदरील रस्त्याच्या दुर्दशामुळे भविष्यात अपघात होण्याची दाट शक्यता आहे. पळसगांव -कुचना रस्ता तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांडून होत आहे. पळसगांव ते कुचना रस्त्यावर मोठी वाहतुक ये-जा करीत असतात त्यात अवैध वाहतुक ,वाळू तस्कर व 50 – 50 टनाचे वाहतुक होत आहे। ग्रामीण भागाचा विकासासाठी रस्त्याची भुमिका फार महत्वाची असते त्यातच रस्त्याची दयनिय अवस्था असतांना संबंधीत विभाग याकडे डोळेझाक करीत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना या रस्त्यामुळे अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे।
वेकोलिच्या सी.एस.आर. आणि जिल्हा परिषद च्या फंडातून लाखो रूपये खर्च करून रस्त्याचे बांधकाम झालेले होते परंतु कंत्राटदाराच्या लालसी वृत्तीमुळे व हयगयपणामुळे रस्त्याची दुर्दशा झालेली आहे याची चौकशी व रस्त्याचे काॅक्रीटीकरण करण्याची मागणी डाॅ. अंकुश आगलावे यांनी पत्रकाव्दारे केलेली आहे।