Home चंद्रपूर  मनसेचा झंझावात गावागावात, प्रचाराला उत्साह

मनसेचा झंझावात गावागावात, प्रचाराला उत्साह

20

 शहरी व ग्रामीण मतदारात  संचाराला उत्साह.

वार्ताहार – वरोरा

विधानसभेची रणधुमाळी सुरु होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघासाठी प्रवीण सुर यांचे नामांकन दाखल करण्यात आले. नामांकन दाखल होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली. मनसेचा झंझावात गावागावात घरोघरी, दारोदारी पोहचला आहे. यामुळे शहरी व ग्रामीण मतदारात चांगलाच उत्साह संचारल्याचे दिसत आहे.

         

प्रवीण सुर यांच्या 15 वर्षांच्या कार्यकाळातील सामाजिक कार्याची, आंदोलनाची आणि उपक्रमाची माहिती मतदारापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. त्या प्रमाणेच या निवडणुकित प्रवीण सुर यांना मतदान करुन वरोरा -भद्रावती विधानसभेवर मनसेचा झेंडा फडकविण्याचे आवाहन मतदारांना करण्यात येत आहे.
मनसे पदाधिकारी, महीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने भेटीगाठीचा धडाका सुरु करण्यात आला आहे. मनसेचा अजेंडा मतदारापर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र सैनिक सज्ज झाले आहेत. तर मतदारांकडून सुद्धा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.