Home चंद्रपूर  *आचार्य बाळशास्त्री जांभेकर चषक डॉक्टर्स संघाने पटकावला*

*आचार्य बाळशास्त्री जांभेकर चषक डॉक्टर्स संघाने पटकावला*

106

माजी सैनिक संघ उपविजेता*

*मैत्री क्रिकेट सामन्यात दिसली खेळ भावनेची चुणूक*

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* :- महाराष्ट्र पत्रकार दिन तथा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचे ( रायझिंग डे सप्ताह) औचित्य साधत पोलीस, पत्रकार, डॉक्टर्स व माजी सैनिक मैत्री दृढ करण्यासाठी नुकताच आनंद निकेतन महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर पोलीस, डॉक्टर्स, पत्रकार व माजी सैनिक यांच्यात मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना खेळला गेला. या सामन्यात डॉक्टर्स संघ विजेता तर माजी सैनिक संघ उपविजेता ठरला. यात सुरुवातीपासून खेळाच्या समाप्तीपर्यंत पूर्णत: खेळ भावनेची चुणूक दिसून आली.
कार्यक्रमात महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ.विकास आमटे, उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी ( भा.पो.से.), माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते, डॉ. हेमंत खापने, माजी सैनिक अनिल चौधरी, म.रा. म.पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण गंधारे, माजी अध्यक्ष बाळू भोयर उपस्थित होते.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला डॉ.विकास आमटे, आयुष नोपानी, अहेतेशाम अली, सुनील बोकडे यांनी माल्यार्पण केले. सोबतच पत्रकार, डॉक्टर्स, माजी सैनिक मंडळींनी सुद्धा पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
सामना सुरू होण्यापूर्वी चारही संघाच्या कर्णधारांनी मिळून आचार्य बाळशास्त्री जांभेकर चषक उंचावला. तद्नंतर पोलीस संघाकडून कर्णधार म्हणून सपोनि निलेश चवरे, डॉक्टर्स संघाकडून कर्णधार डॉ. अमोल हजारे मैदानात पोहचले. पोलीस संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला या चुरसीच्या सामन्यात डॉक्टर्स संघाने पोलीस स़घाचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात माजी सैनिक संघाकडून कर्णधार ऋषी मडावी, पत्रकार संघाकडून कर्णधार राजेंद्र मर्दाने मैदानात पोहचले. माजी सैनिक संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या चुरसीच्या सामन्यात माजी सैनिक संघाने पत्रकार संघाचा पराभव केला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अखेरच्या षटकापर्यंत रोमांच टिकवून ठेवला. सामन्यात अनेक रोमांचक क्षण ही आले. दोन्ही संघाचे खेळाडू आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवित होते. सर्वच सामने रंगतदार झाले. खेळात सुरूवातीपासूनच चारही संघाने खेळ भावनेची चुणूक दाखवली.
अंतिम सामना डॉक्टर्स संघ व माजी सैनिक संघात झाला. या सामन्यात डॉक्टर्स संघ विजेता तर माजी सैनिक संघ उपविजेता ठरला.
डॉ. विकास आमटे,आयुष नोपानी, अहेतेशाम अली व अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेता, उपविजेता संघास स्व. गीताबाई कचरूबाबू निर्बाण स्मृतिप्रीत्यर्थ सतीश निर्बाण यांच्या तर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर चषक प्रदान करण्यात आले.
बेस्ट बॅट्समॅन श्रीकांत बांदूरकर, बेस्टबॉलर डॉ.कष्टी, तर सामनावीर म्हणून डॉ. हेमंत खापने यांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
वरील सामन्यात नितीन मत्ते, विनोद सोयाम, शौकत अली खान आणि खिलेश्वर कष्टी आदींनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी माजी सैनिक अनिल चौधरी डॉ. मुळेवार, डॉ.जगदीश वैद्य, सतीश निर्बाण प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वरोरा उपाध्यक्ष आलेख रठ्ठे, सचिव शाहिद अख्तर, माजी अध्यक्ष बाळू भोयर, सदस्य खेमचंद नेरकर, हरीश केशवाणी, बबलू राय, सुरेंद्र चौहान, गौरव मेले, माजी सैनिक सागर कोहळे, रूपेश कुत्तरमारे, ढोके, तुराणकर, पोलीस विभागातील सपोनि अविनाश मेश्राम, पोउपनि किशोर मित्तलवार, नपोअं किशोर बोढे, मोहनलाल निसार, अमोल नन्नावरे, प्रवीण निकोडे, कपिल भडारवार, पोअं दीपक मोडक, प्रदीप ताडाम दिनेश मेश्राम, विठ्ठल काकडे, सूरज मेश्राम, डॉ. कपिल टोंगे, डॉ. कैलास वाघ, डॉ.राकेश पिंपळकर डॉ. हर्षल चतुरकर, डॉ.वैभव कष्टी, डॉ. विक्रांत भेंडे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन संघाचे कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले. आभार संयोजक राजेंद्र मर्दाने यांनी मानले.
दोन्ही संघांच्या खेळाडूं कडून सामन्याचे मनोरंजक समालोचन करण्यात आले. पटांगणावर सामना बघण्यासाठी मोठी गर्दी होती.
*पत्रकार दिनानिमित्त डॉ. विकास आमटे यांचा सत्कार*
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ वरोरा तर्फे पत्रकार दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवी तथा महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी ( भा.पो.से), समाजभान जपणारे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी क्रमशः सुनील बोकडे, बाळू भोयर, प्रवीण गंधारे व शाहिद अख्तर याच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशनही करण्यात आले.