Home बड़ी खबरें *पोटच्या मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास न्यायमूर्ती भेंडेंनी दिली आजन्म कारावासाची शिक्षा*

*पोटच्या मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास न्यायमूर्ती भेंडेंनी दिली आजन्म कारावासाची शिक्षा*

115
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* :- जन्मदाता पिता असलेल्या सुभाष बापूराव भडके या नराधमाने पोटच्या मतिमंद मुलीला वेळोवेळी धमकावून व तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत अनेक महिने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत लैंगिक शोषण केल्यानेच गर्भधारणा झाल्याचे सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.के. भेंडे यांनी वेगवेगळ्या कलमांचा आधार घेत त्यास दंडासहित मृत्यूपर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावल्याने सुजाण नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मे २०१८ मध्ये वरोरा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्यावर न्यायालयाने अल्पावधीत निकाल घोषित केल्याने जनमानसात न्यायालयावरील विश्वास दृढ होण्यास मदत होणार आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, वरोरा तालुक्यातील निलजई गावातील आरोपी सुभाष बापूराव भडके (वय ५० वर्षे) हा पत्नी लता, एक मुलगा वय १८ वर्षे व एक मतिमंद मुलगी वय २० वर्षे यांच्या सोबत राहत होता. तक्रारीच्या ६-७ महिन्यांपूर्वी पिडीत मुलीची आई शेतमजूरीसाठी बाहेर गेली होती व मुलगा बकऱ्या चारण्यासाठी गेला असता घरात पिता सुभाष भडके व २० वर्षीय मतिमंद मुलगीच होती. सायंकाळी जेव्हा मुलीची आई घरी आली तेव्हा मुलीचा पिता मतिमंद मुलीशी जबरी संभोग करीत असल्याचे निदर्शनास आले. दोघांना निवस्त्र अवस्थेत बघून ती पतीवर ओरडली व पतीला धमकावले. आरोपीने घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास, पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास फिर्यादी व मुलगा व मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. जीवे मारण्याची धमकी दिल्याने तेव्हा पिडीताच्याआईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली नाही. १२ मे २०१८ ला सुद्धा आरोपीने सकाळी १०.०० वाजता पुन्हा पत्नी, ,मुलगा,व मुलगी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हा आरोपीच्या त्रासाला कंटाळून पत्नी लता आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आपल्या माहेरी नारायणपूर, तह. समुद्रपूरला निघून गेली. तिथे मुलीला गर्भधारणा आहे का अशी विचारणा केली असता लताने आपल्या माहेरच्या मंडळींना संपूर्ण हकीकत सांगितली. माहेरच्या मंडळींनी हिम्मत दिली तेव्हा पत्नी लताची मानसिकता बदलली माहेरच्या मंडळीच्या पुढाकाराने पिडिताच्या आईने वरोरा पोलीस स्टेशन गाठले व पती सुभाष भडके याच्या विरोधात, मतिमंद मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून गर्भधारणा केल्याची तक्रार १४ मे २०१८ रोजी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली.
वरोरा पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ५३२/१८ अंतर्गत फिर्याद नोंदवून ३७६ (२) (जे) (एफ) (एल) (एन) ३२३, ५०६ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला गेला. या गुन्ह्याचा तपास सहा पोलीस निरीक्षक अनिल मांडवे यांनी करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात न्यायालयात सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. आज गुरुवार ( ११ नोव्हेंबरला ) या केसचा अंतिम निकाल लागला.
आरोपी विरूद्ध आरोप सिद्ध झाल्याने वरोरा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.के भेंडे यांनी आरोपी सुभाष भडकेला मृत्यूपर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. मिलिंद देशपांडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली व कोर्ट पैरवी म्हणून चरणदास पिदुरकर यांनी कामकाज पाहिले.