Home चंद्रपूर  वरोरा व भद्रावती येथे फार्मासिस्ट करीता एक दिवसीय रिफ्रेशर्स कोर्सचे यशस्वीरित्या आयोजन

वरोरा व भद्रावती येथे फार्मासिस्ट करीता एक दिवसीय रिफ्रेशर्स कोर्सचे यशस्वीरित्या आयोजन

56

वरोरा- PCI / MSPC चे कार्यकारिणी सदस्य व अखिल भारतीय केमिस्ट संगठने चे मा.श्री. आप्पासाहेब उर्फ़ जगन्नाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून व एमएससीडीए उपाध्यक्ष सर्वाचें लाड़के श्री मुकुंदजी दुबे तसेच MSPC चे अध्यक्ष मा.श्री. अतुलजी अहीरे यांच्या नेतृत्वाखाली हा रिफ्रेशर कोर्स आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला चंद्रपुर जिल्हा केमीस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशनचे चे अध्यक्ष श्री गोपालजी एकरे, उपाध्यक्ष श्री रवीजी आसुटकर, सहसचिव श्री अनुपजी वेगिनवार, घाऊन औषध विक्रेता प्रतिनिधि अनिलजी काळे, चंद्रपुर तालुक़ा अध्यक्ष कवेशजी सहारे, चिमुर तालुक़ा अध्यक्ष, अजय जी चौधरी, सचिव स्नेहदिप खोब्रागडे, वरोरा तालुका अध्यक्ष सुनीलजी सातपुते, सचिव नितिन मोरे, भद्रावती तालुक़ा अध्यक्ष अविनाश जी पारोधें, सचिव बबलू रॉय, माजी उपाध्यक्ष श्री राजुभाऊ वानखडे, ज्यांनी हॉल उपलब्ध करुण दिला असे श्री संजयजी गुंडावार व ईतर मान्यवर सदस्य फार्मासिस्ट उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल फार्मासीस्ट अपग्रेडेशन करीता सदैव प्रयत्नशील आहे याचा फायदा सर्व तालुक़ा संघटनेने घ्यावा व जिल्हातर्फ़े अशा प्रकारची फार्मासिस्ट रिफ्रेशर्स कोर्स ची MSPC – DIC ला मागणी करावी, महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल त्याला ताबडतोब मंजुरी देईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे उपाध्यक्ष धनंजय जोशी यानी दिली आणि कार्यकारिणी सदस्या सौ सोनाली पडोळे यांनी फ़ोनवर सांगितले.

*यावेळी माजी सहआयुक्त डॉ पुष्पहास बल्लाळ, ड्रग इंस्पेक्टर श्री मनीषजी चौधरी, माज़ी MSPC सदस्य श्री हरीशजी गणेशानीं, प्राचार्य डॉ भुषणजी साठे, श्री मीलींद भोयर, Hi-Tech कॉलेज चे उपप्राचार्य श्री सतीश जी मोहितकर व DIC चे Technical Incharge श्री भुषण माळी यांनी फार्मासिस्टला मार्गदर्शन केले.

सदर कोर्स करीता *MSPC* चे श्री भरतजी थोपटे यानि सहकार्य केले. यामाध्ये कार्यक्रमात वरोरा, भद्रावती, चिमुर येथील फार्मासिस्ट मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भद्रावती,वरोरा व चंद्रपुर जिल्हा केमीस्ट संघटनेच्या पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.