Home चंद्रपूर  *व्हॉलीबॉलच्या माध्यमातून देशभरात नावलौकिक प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थीनींचा सत्कार आयोजित*

*व्हॉलीबॉलच्या माध्यमातून देशभरात नावलौकिक प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थीनींचा सत्कार आयोजित*

68

*लोकशिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी १९ मार्च रोजी आयोजित मेळाव्याचा लाभ घ्यावा*
– *लोकमान्य माजी विद्यार्थी संस्था, वरोडा*

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : लोकशिक्षण संस्था, वरोडाद्वारा संचालित शाळा व महाविद्यालयांच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या लोकमान्य माजी विद्यार्थी संस्थेतर्फे येत्या १९ मार्च २०२३ रोजी संस्थेच्या आवारात सकाळी ९.३० ते ३.३० कालावधीत माजी विद्यार्थ्यां मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी लोकमान्य कन्या विद्यालयातील व्हॉलीबॉल या खेळाच्या उपक्रमाला ५० वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने क्रिडा प्रशिक्षक कै.बळवंत दारापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉलीबॉल खेळात ज्या विद्यार्थ्यांनींनी लोकमान्य कन्या विद्यालयाचा नावलौकिक देशभरात निर्माण केला त्यांचा सत्कार व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देत संबंधित विद्यार्थ्यांनी त्यात हिरीरीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेचे सचिव प्रा. विश्वनाथ जोशी यांनी कन्या विद्यालयात आयोजित पत्र परिषदेत केले.
याविषयी अधिक माहिती देतांना प्रा. जोशी म्हणाले की, लोकशिक्षण संस्थेची स्थापना सन १९५२ ची असून त्या अंतर्गत लोकमान्य विद्यालयव कनिष्ठ महाविद्यालय, लोकमान्य प्राथमिक विद्यालय, लोकमान्य कन्या विद्यालय, लोकमान्य महाविद्यालय, लोकमान्य विद्यालय ( इंग्रजी माध्यम) द्वारे आजतागायत लाखों माजी विद्यार्थी येथील संस्कारांचा लाभ घेऊन बाहेर पडल्यावर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, पत्रकार, उद्योजक, अधिकारी, क्रीडा, कला, सांस्कृतिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
येत्या १९ मार्च रोजी सकाळी ९.३० ते १०.००, १०.०० ते ११.००, ११.०० ते१२.००, दुपारी १२.०० ते १.००, १.०० ते २.००, २.०० ते २.३० व २.३० ते ३.३० अशा सत्रात आयोजित या मेळाव्यात उद्घाटन सोहळा, ‘”असे घडलो आम्ही ” या विषयावर माजी खेळाडूंची मुलाखत, याखेरीज माजी विद्यार्थ्यांची मनोगते, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी जवळपास ४०० विद्यार्थी सहभागी होतील, असे माजी विद्यार्थी संस्थेचे सचिव अनिल नानोटकर यांनी सांगितले. सहयोग राशी, माजी विद्यार्थी सभासद शुल्क ३०० रूपये निश्चित करण्यात आलेआहे. माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी कमेटीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
पत्रपरिषदेत लोकशिक्षण संस्था सचिव प्रा. विश्वनाथ जोशी, लोकमान्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता धोपटे, माजी विद्यार्थी सचिव अनिल नानोटकर, कोषाध्यक्ष प्रा. रवींद्र शेंडे, राघवेंद्र अडोणी, महेश पेटकर आस्थापनेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.