Home चंद्रपूर  *जुनी पेन्शन योजनेसाठीच्या राज्यव्यापी संपात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची लक्षवेधी निदर्शने*

*जुनी पेन्शन योजनेसाठीच्या राज्यव्यापी संपात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची लक्षवेधी निदर्शने*

66

*उपजिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालय, नगर परिषद परिसरात कर्मचाऱ्यांचे आंदोलन*

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : ०१ नोव्हेंबर,२००५ व त्यानंतर नियुक्त शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी १४ मार्च २३ पासूनच्या राज्यव्यापी बेमुदत संपात जोरदार निदर्शने करीत सहभाग नोंदविला आहे.
महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर, २००५ व त्यानंतर नियुक्त राज्य सरकारी, निम सरकारी इ.सर्व कर्मचाऱ्यांना/अधिकाऱ्यांना नवी पेन्शन योजना (एन.पी. एस.) रद्द करून जुनी पेन्शन योजना ( महाराष्ट्र नागरी सेवा सेवानिवृत्ती वेतन नियम १९८२ व नियम १९८४ ) पुन्हा पूर्ववत लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी दि.१४ मार्च २०२३ पासून पुकारण्यात आलेल्या संपात राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संबंधित कर्मचारी/अधिकारी यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्याचे निदर्शनास आले. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सेवेवर याचा परिणाम झाला. बेमुदत संपादरम्यान आपातकालीन सेवा सुरू राहील असे, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.राठोड यांनी सांगितले
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीसाठी सकाळ व दुपारच्या सत्रात कर्मचाऱ्यांनी सामूहिकरित्या विविध लक्षवेधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.