Home चंद्रपूर  *दुकानाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान*

*दुकानाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान*

109
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : शहरातील यात्रा वार्डातील हनुमान मंदिर जवळील महेश ट्रेडिंग कंपनी नामक दुकानाला सोमवारी ( दि. १३ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याचा दावा करण्यात येत आहे. अग्निशामक दलाच्या सहाय्याने अथक परिश्रमानंर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
अधिक माहिती नुसार यात्रा वार्डातील हनुमान मंदिराजवळील महेश ट्रेडिंग कंपनी या दुकानाला सोमवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. दुकानासमोर असलेल्या नगर भवनाचे संचालक रहमान यांना प्रथमतः दुकानातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. दुकानाला आग लागल्याचे दिसून येतात रहमान यांनी पहाटे जवळपास ६.३० वाजताच्या सुमारास दुकानाचे मालक महेश पोपट यांना भ्रमनध्वनी वरून माहिती दिली. माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहचले. आगीची तीव्रता लक्षात घेता त्यांनी नगर परिषद अग्निशामक दला सोबतच जीएमआर कंपनी व वेकोलीच्याच्या अग्निशामक दलाला देखील आगीची माहिती दिली. माहिती नंतर १० मिनटात नगर परिषदेची अग्निशामक गाडी पोहचल्याचे सांगण्यात येते. तद्नंतर जीएम आर व वेकोलीची ही गाडी पोहचली. दोन मजली इमारतीच्या ग्राऊंड फ्लोरवरच आग लागली असल्याने ती विझविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.दुकानात विविध ब्रांडचे खाद्य तेलाचे पिंपे, डालडा, बेसन, आटा, रवा, साबन, वाशिंग पावडर ,अन्य जीवनावश्यक सामुग्री इ.दी असल्याने त्यातही विशेषतः तेल व डालडा असल्याने पाणी मारल्यानंतर राहून राहून पुन्हा आग पकडत होती. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.अखेर दोन – तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात दलाला यश मिळाले. आगीत लाखोंचे सामान जळून खाक झाले. आग विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करावा लागल्याने दुकानातील अन्य सामुग्रीचेही नुकसान झाले. शिवाय आगीने बिल्डींगलाही काही ठिकाणी क्रॅक गेले. शार्ट सर्किटने ही आग लागल्याचे सांगून या आगीत जवळपास ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकानाचे मालक महेश पोपट यांनी वर्तविला आहे. आगीत आजुबाजुला कोणतेही नुकसान झाले नसल्याचे ही त्यांनी सांगितले.