Home चंद्रपूर  *वरोरा न.प. क्षेत्रातील विविध समस्यांना घेऊन भाजपचा एल्गार ; मुख्याधिकारी यांना निवेदन...

*वरोरा न.प. क्षेत्रातील विविध समस्यांना घेऊन भाजपचा एल्गार ; मुख्याधिकारी यांना निवेदन दिले*

64

*वरोरा* : शहरातील विविध समस्यांवर नगर पालिका प्रशासनाने उपाययोजना करावी यासाठी भारतीय जनता पार्टी शिष्टमंडळातर्फे मागण्यांचे न.प. मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.निवेदनानुसार वरोरा शहरात महिने ओलटून सुध्दा नाली सफाई, कचरा सफाई होत नाही यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे. प्र. क्र.४ मधील पाणीचा टाकीचे काम एकदम कासव गतीने सुरू आहे. ठेकेदारांनी घेतलेली कामे अजूनही पूर्ण न झाल्याने लोकांना त्रास होत आहे. वॉर्डातील स्ट्रीट लाईट अधून मधून बंद राहतात. यामुळे शहरात चोरीचे प्रमाण वाढत आहे. शहरातील लोकांना गोड पाणी मिळावे यासाठी नगर प्रशासनाने उपाययोजना करावी, आदी मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टी तर्फे मुख्याधिकारी गजानन भोयर यांना देण्यात आले.या प्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते – बाबा भागडे, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, भाजयुमोचे प्रदेश सचिव करन देवतळे, शहर अध्यक्ष सुरेश महाजन, विठल लेडे, आशिष ठाकरे, विनोद लोहकरे, सूनिताताई काकडे, जगदीश तोटावार, इकबाल शेख, संजय राम, राहुल बांदुरकर, अभय मडावी, शरद कातोरे, प्रमोद खापने, खुशाल बावणे आदीं उपस्थित होते.