Home चंद्रपूर  *विदर्भ पत्रकार विकास समितीतर्फे आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेतील उत्तीर्ण परीक्षार्थी जल्लोषात सन्मानित*

*विदर्भ पत्रकार विकास समितीतर्फे आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेतील उत्तीर्ण परीक्षार्थी जल्लोषात सन्मानित*

91
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विदर्भ पत्रकार विकास समिती, वरोरा यांच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना स्थानिक नगर भवन येथे पार पडलेल्या समारंभात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थान वरोरा भद्रावती क्षेत्रातील आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भूषविले.
व्यासपीठावर मुख्य मार्गदर्शक म्हणून एक्सलेंट अकॅडमी ऑफ सायन्सचे संचालक अभय टोंगे, वरोरा बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता मिलिंद देशपांडे, वरोरा तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सागर वझे, आनंद निकेतन कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, डॉ. विवेक तेला, डॉ राहुल धांडे, विदर्भ पत्रकार विकास समितीचे अध्यक्ष चैतन्य लुतडे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभय टोंगे म्हणाले की, आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. आत्मविश्वासामध्ये अशक्य ते शक्य करण्याची प्रचंड शक्ती असते. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जग ही जिंकू शकता. परिस्थिती ही यशाच्या मार्गावर अडसर ठरत नाही. परिस्थितीला दोष देऊन जे जीवन जगतात ते कधीच यशस्वी होऊ शकत नाही.
अध्यक्षीय भाषणात आमदार धानोरकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये. आत्मविश्वास निर्माण करून कोणत्याही कार्याप्रति सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अपेक्षित यश गाठता येते. स्पर्धेच्या सफल आयोजनासाठी त्यांनी विदर्भ पत्रकार विकास समितीच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
डॉ.सागर वझे म्हणाले की, सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावावी.
यावेळी डॉ. सुहास पोतदार, डॉ. धांडे, डॉ. तेला, अॅड. देशपांडे, विनोद खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात लुतडे यांनी समितीची भूमिका मांडून श्रोत्यांना उदंड प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील जवळपास ३ हजार विद्यार्थ्यांसह ज्ञान प्रेमीं, दिव्यांगांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. इयत्ता ५ ते १० वी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह खुला गट व दिव्यांग विद्यार्थी गट अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आली. ५ वी ते १० वी या गटातून प्रज्वल चिडे याने प्रथम, रितेश मुसळे याने द्वितीय ,पायखिना काळपांडे ने तृतीय, अयेमन शेख याने चतुर्थ तर खुल्या गटातून विद्याधर पाटील ने प्रथम, योगिता येंचलवार ने द्वितीय, आशिष शेळके ने तृतीय, रोशन पांढरे याने चतुर्थ आणि दिव्यांग गटातून अमन गायकवाड ने प्रथम, अनिषा भोस्कर ने द्वितीय व अमोल पवार याने तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेत अव्वल आलेल्या विजेत्यांना प्रमुख मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ, रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, भारताचे संविधान व अन्य पुस्तक पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आले. समारंभात साहिल बोढाले, परिवर्तन बोढे, नमन आसूटकर, देव्यानी पाटील,सुयोग आवारी,कृतिका आमटे, यश कारेकार,सुशांत भोयर, गौरव रिठे, विशाल मिसार,सुमित ठेंगणे,सतीश वाभिटकर,चेतन नन्नावरे यांना प्रोत्साहनपर पुरस्कार वितरित करण्यात आले. थोरवी चैतन्य लुतडे, अनिरुद्ध प्रवीण मुधोळकर, आर्यन अनिल पाटील यांना विशेष पुरस्कार तर स्पर्धेत ५० पेक्षा अधिक गुणांक प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात सहभागी शाळेच्या मुख्याध्यापक/ प्राचार्याना पुष्प व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी प्रोत्साहनपर बक्षीस देणाऱ्या मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात निजबल अंतर्गत संधी निकेतन अपंगांची कर्मशाळा ( आनंदवन ) चे अधीक्षक रवींद्र नलगिंटवार, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक नवले, आनंद माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या टोंगे, योगेश ठक्कर, सामाजिक कार्यकर्ते जुबेर कुरेशी, दादा जयस्वाल, बंडू देऊळकर, प्रमोद काळे, प्रवीण सुराणा, अशोक बावणे, विवेक बर्वे, राहुल देवडे, रिषभ रट्टे, तुषार मर्दाने, अंकित पोहनकर, जयश्री निखाडे, पल्लवी डाहुले, अमृता गोहोकार, पत्रकार प्रदीप कोहपरे, प्रशांत खुळे, हरीश केशवाणी, मनोज श्रीवास्तव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ पत्रकार विकास समितीचे सचिव राजेंद्र मर्दाने यांनी केले. आभार डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी मानले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समितीचे उपाध्यक्ष अनिल पाटील, पदाधिकारी शाहीद अख्तर, प्रवीण गंधारे, सारथी ठाकुर आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, पत्रकार, स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शहरातील गणमान्य व्यक्ती व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. पुरस्कार प्रदान करतेवेळी होणाऱ्या टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दणाणून. जल्लोश वातावरण निर्मिती झाल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.