भद्रावती:- भद्रावती विकास खंड औद्योगिक बहूउद्देशीय ग्रामीण कारागीर सहकारी संस्था मर्यादित ( बी एल वि ) आमसभा संस्थेच्या कार्यालयात सभा घेण्यात आली या आंसभेचे अध्यक्ष कवडू पवाडे यांच्या अध्यक्ष खाली घेण्यात आली या आंसभेचे उदघाटन राजू गैनवार संस्थेचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून कवडू पावडे संस्थेचे अध्यक्ष / राजू गैनवार उपाध्यक्ष व माजी नगरसेवक / किशोर बावणे / सुशीला आवारी / वंदना मेश्राम / शरला पडवेकर हे मंचावर उपस्थित होते. सर्व प्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माला अर्पण करण्यात आले व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यासंस्थेचे उद्दिष्ठ व कार्यप्रणाली सांगण्यात आले व अहवाल वाचन प्रवीण आत्राम संस्थेचे सचिव ( खादी ग्रामोद्योग बोर्ड महामंडळ ) यांनी केले बेरोजगारांना कर्ज व रोजगार देने त्यांना उद्योग धंद्यांना प्रोसाहन करणे ताळे बंद / नफा तोटा / जमा खर्च / एडिट नोट तापासण्यात आले.
सभेचे विषय:-
१ मागील आंसभेचे सभा वृत्तांत वाचून मंजूर करणे .
२ संस्थेचे सण २०२०/२०२१ ची आर्थिक वर्षाचे विवरण. पत्रके ( जमा खर्च / नफा तोटा / ताळे बंद) वाचून कायम करणे.
3 सण 2021 / २०२२ चे अंदाज पत्रकास मंजुरी देने .
4 नियम ३४ प्रमाणे सण २०२१/ २०२२ साला करीता बाहेरील कर्ज घेण्याची मर्यादा ठरविणे .
5 सण 2020 २०२१ चा लेखा परीक्षण अहवाल वाचन करून दोष दुरुस्तीत मंजुरी देने .
6 लेखा परिक्षकाचे नेमणुकीस मान्यता देने.
7 सण 2020 / 2021 च्या अंदाज पत्रकापेक्षा जास्त झालेला खर्चास मंजुरी देने इत्यादी विषयावर चारच्या करून सर्वानूमते या ठरावास मंजुरी देण्यात आली या बैठकीला प्रकाश पिंपळकर / ज्ञानेश्वर डुकरे / गजानन जोगी / वसंता उमरे इत्यादी असंख्य सभासद हजर होते।