Home चंद्रपूर  *”मिशन जय किसान” अंतर्गत शेतकरी जनजागरण संयुक्त मोहीमेचा शुभारंभ*

*”मिशन जय किसान” अंतर्गत शेतकरी जनजागरण संयुक्त मोहीमेचा शुभारंभ*

92

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : चंद्रपर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ ला सुरुवात झाली असून राज्याचे वन व सांस्कृतीक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतुन ” मिशन जय किसान” अंतर्गत विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी, शेतकरी जनजागरण संयुक्त मोहिम वरोरा तालुक्यात राबविण्यात येणार असुन गावागावात चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. सदर मोहिमेचा शुभारंभ चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे व वरोरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडशेलवार यांच्या हस्ते पंचायत समिती वरोरा परिसरात चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
याप्रसंगी प्रादेशिक संशोधन केंद्र, एकार्जुना येथील कृषि शास्त्रज्ञ अमरशेट्टीवार, पंचायत समितीचे सहा.गटविकास अधिकारी तितरे, तालुका कृषि अधिकारी गजानन भोयर, पंचायत समितीचे कृषि अधिकारी जयंत धात्रक, मंडळ कृषि अधिकारी वरभे,काळे, पाटील, पंचायत समितीचे कृषि अधिकारी नरेंद्र पेटकर, रायपुरे उपस्थित होते.
२२ मे ते ३१ मे या दरम्यान आयोजित शेतकरी जनजागृती अभियानात शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचे रासायनिक खते, बी – बियाणे, कीटकनाशके या कृषि निविष्ठा प्राप्त होण्याच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याकरिता त्यांना पीक पेरणीचे विविध तंत्रज्ञान, योग्य पीक संरक्षण पद्धतीनुसार कामगंध सापळ्याचा वापर करून नैसर्गिक किड नियंत्रण, उकिरडा मुक्त गावाद्वारे सेंद्रिय खत निर्मिती व स्वच्छता, रासायनिक खताचा कार्यक्षम वापर, केंद्र शासनाद्वारे अनुदान देण्यात येणाऱ्या खताबाबत माहिती, कीटकनाशकाचा विद्यापीठाच्या शिफारसीनुसार नियंत्रित वापर, प्रमाणित उगवण शक्ती असलेल्या जास्त उत्पन्न देणाऱ्या बियाण्याचा वापर, ग्राम बिजोत्पादन मोहीम अंतर्गत साठविलेल्या बियाण्याचा वापर, पिकाच्या वाढीसाठी, सूक्ष्म मूलद्रव्याचे आवश्यकता डॉ. पंदेकृवि, अकोला यांच्या दैनंदिनीचा कृषि तंत्रसाठी वापर, कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती यासारख्या उपयुक्त बाबीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
यावेळी पंचायत समिती वरोरा येथिल कर्मचारी वृंद, परिसरातील शेतकरी, खत व बियाणे कंपनीचे प्रतिनिधी यांची लक्षणीय उपस्थिती होती.