Home चंद्रपूर  *प्राचार्या सुनंदा पिदूरकर संघरत्न पुरस्काराने सन्मानित*

*प्राचार्या सुनंदा पिदूरकर संघरत्न पुरस्काराने सन्मानित*

79

*वरोरा* : मानवाधिकार सहायता संघ (भारत)यांचे द्वितीय राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच चंद्रपूर येथील वन प्रबोधिनी येथे पार पडले. या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्षा मीना शर्मा यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश महामंत्री प्राचार्य सुनंदा पिदूरकर यांना त्यांच्या अतुलनीय, उत्कृष्ट कार्याबद्दल संघ -रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोनू सिंह, प्रदेश अध्यक्ष रवी धारणे, प्रदेशप्रमुख कल्पेश व्यास, राष्ट्रीय उपाध्यक्ष हेमलता धारणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुनंदा पिदूरकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ” या पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे मला पुढे संघटनेचे कार्य करताना आणखी उर्जा मिळणार आहे. दीनदुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पुढेही सक्रिय कार्यरत राहील “.