Home चंद्रपूर  डॉ आगलावे यांनी ग्रामस्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला- हंसराज अहीर

डॉ आगलावे यांनी ग्रामस्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला- हंसराज अहीर

109

वरोरा:- गणेश चतुर्थी निमित्त श्री. गुरूदेव व्यायाम शाळा व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन 23 सप्टेंबर ला कार्यक्रमाचे अध्यक्ष पुर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराजी अहीर, यांचे हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अहीर यांनी डॉ. अंकुश आगलावे यांचा कामाचा आढावा घेत कोरोना काळात दोनशेहून अधिक गावांत अन्न धान्याचे किट्स पोहचवून निस्वार्थ समाजसेवा केली तसेच ग्रामस्वच्छता रथयात्रा काढून ग्रामस्वच्छतेचा संदेश दिला असे अहीर यांनी उद्घाटन प्रसंगी प्रास्तविक भाषणातून गौरवउद्गार काढले.
प्रमुख पाहुणे मोरेश्वर टेमुर्डे यांनी आपल्या भाषणातुन ग्रामगीतेशिवाय पर्याय नाही, गुरूदेव सेवा मंडळच या क्षेत्राचा विकास करू शकते सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचेही सांगितले. या कार्यक्रमात अर्चनाताई जीवतोडे जि.प. सदस्य, प्रविण सुर जि.प.सदस्य, प्रविण ठेंगणे पं.स सभापती, नरेंद्र जीवतोडे, रमेश राजुरकर, पंढरपूर आश्रमाचे अध्यक्ष ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन पंढरपूरचे संचालक सेवकराम मिलमिले, सत्संग मंडळ कुसना, लक्ष्मणराव गमे मोझरी आश्रमचे सर्वाधिकारी, रूपलाल कावळे जिल्हा गुरूदेव प्रचारक , चंद्रपूर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
सदर्हू कार्यक्रमात वरोरा-भद्रावती क्षेत्रातील 26 गावातील सरपंच, 51 बचतगट, 12 तंटामुक्ती अध्यक्ष, 65 विविध शासकीय योजनेचे लाभार्थी, 52 गावातील गुरूदेव सेवा मंडळाचे भजनमंडळांनी सहभाग घेतला.
या उद्घाटन व सत्कार समारंभ प्रसंगी मान्यवरांचे हस्ते सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे तथा श्री गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष व सेवक, विविध ग्रामपंचातीतील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, महीला बचत गट व शासकीय योजने लाभार्थींचा शाल श्रीफळ,भगवी टोपी, ग्रामगीता, मानचिन्ह, देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अंकुश आगलावे ,विदर्भ प्रदेश अध्यक्ष, केंद्रीय मानवाधिकार संगठन यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.प्रशांत खोडे तर आभार प्रदर्शन सेवकराव मिलमिले यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता सतीश दांडगे, हॅडसन राव, संदीप भोयर, दिनेश ठाकरे, सचिन फुंडकर, मंगेश मारतडे, प्रफुल ताजने गुरूजी, विजय ताजने, नगाजी साळवे गुरूजी, शंकरराव सोनटक्के, आनंदराव ढवस, गजानन ढवस, सुभाष पिंपळकर , राजु देठे, लहू आगलावे, संतोश काळे, संदीप झाडे, निलेश ढवस, बंडू वनकर ,गायत्री येलमेलवार, बबलु रॉय, माला काकु, पद्मा केंदाळा बिंदी सिंग, सुनिता यादव इत्यादींने अथक परिश्रम घेतले.