*वरोरा* : भारतीय क्षेपणास्त्राचे प्रणेते, भारताचे ११ वे राष्ट्रपती, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांच्या ७ व्या स्मृतिदिनी त्यांना विविध सामाजिक संघटने तर्फे येथील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम चौकात आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे उप सेवाधिकारी लक्ष्मणराव गमे हे होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकरराव राठोड, नगर परिषदेचे माजी सभापती तथा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया कुमी तजिम छोटुभाई शेख, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत खापने, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी रुपलाल कावळे, वरोरा पेन्शनर संघाचे अध्यक्ष आबाजी देवाळकर, जेष्ठ नागरिक संघाचे सचिव मारोतराव मगरे, आनंदवन मित्र मंडळ वरोराचे सचिव, माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मर्दाने, न.प.चे माजी उपाध्यक्ष अनिल झोटिंग, माजी सैनिक संघटनेचे सागर कोहळे, प्रवीण चिमूरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
कावळे म्हणाले की, एक गरीब परिवारातील मुलगा ते महान वैज्ञानिक आणि देशाचे राष्ट्रपती असा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवणप्रवास थक्क करणारा आणि तितकाच विद्यार्थ्यांना व तरुणांना प्रेरणा देणारा आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात गमे म्हणाले की, डॉ. अब्दुल कलाम यांचे विचार युवापिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे. छोटुभाई यांच्या पुढाकाराने विविध संघटनेच्या माध्यमातून डॉ. कलाम चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन खरंच कौतुकास्पद आहे.
याप्रसंगी डॉ. हेमंत खापने, राजेंद्र मर्दाने, आबाजी देवाळकर, मारोतराव मगरे, सागर कोहळे आदिनी यांनी डॉ. अब्दुल कलाम याच्या जीवनावर प्रकाश टाकला.
सुरुवातीला डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली तदवतच् दौन मिनट मौन धारण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन छोटुभाई शेख यांनी केले.
याप्रसंगी माजी नगरसेवक सनी गुप्ता, जगतगुरु नरेंद्र महाराज संस्थांचे जिल्हाध्यक्ष निबुदे, लोंढे गुरुजी, पाल सर, मोहसीन पठान, राकेश सोनानी, परदे, प्रमोद निकिळे आदीसह
विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.