Home क्राईम शांतता समितीची बैठक संपन्न।।

शांतता समितीची बैठक संपन्न।।

105

प्रतिनिधि-राजू गैनवार
भद्रावती।।
येथील पोलिस स्टेशन मध्ये तत्काळ शांतता समितीची बैठक घेण्यात आली आताच नव्याने रुजू झालेले ठाणेदार गोपाल भारती यांनी येणारे सन उत्सव गोकुळ जन्माष्टमी / पोळा /गणेश चतुर्थी / दुर्गा /शारदा / नवरात्र / दशहरा या बद्दल गावात शहरात शांतता सुव्यवस्था राखावी व कायद्याचा भंग होऊ नये म्हणून ही बैठक घेण्यात आली।
या बैठकी मध्ये अनिल धानोरकर अध्यक्ष नगर परिषद भद्रावती, संतोष आमने उपाध्यक्ष नगर परिषद भद्रावती, मुनाज शेख महाराष्ट्र प्रदेश सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , कामरेड राजू गैनवार पत्रकार व माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष, प्रफुल चतकी नगर सेवक,नीलेश पाटील नगर सेवक, शेख रब्बानी सामाजिक कार्यकर्ता, खेमचंड हरियाना व्यापारी असोसिएनचे पदाधिकारी ,संतोष रामटेके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, साहेब राव घोरूडे,विशाल बोरकर जिल्हा उपाध्यक्ष बहुजन समाज पार्टी व सामाजिक कार्यकर्ता इत्यादी उपस्थित होते।
यामध्ये कोरोनावर मात करणे, मास न लावणे वर कारवाही करणे, गुरुदेव सेवा मंडळ तर्फे स्वच्छ ता अभियान राबविणे,गाडी रेसिंग करणे वर कारवाही करणे तीबल सिट ,दारू पिऊन वाहन चालविणे ,अवैध्य धंदे,चिडी मारी,महिलांवर अत्याचार करणे,गुंडागर्दी इत्यादी विविध विषयावर सखोल चर्चा करण्यात आली या विषयावर ठाणेदार गोपाल भारती यांनी अपराधी वर कारवाई करण्यात येईल व असे कुठेही अनुचित प्रकार घडल्यास जनतेने थेट पोलिस स्टेशन मध्ये सांगावे असे सांगितले। उपस्थित असलेल्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अनेक विषयावर चर्चा केल्या आणि भद्रावती हे शहर सर्व धर्म-समभाव आहे व कायद्याला मानतात व सर्वाचे आभार मानले या बैठकीला पोलीस अधिकारी व सर्व पक्षाचे नेते व सामाजिक संघटना व व्यापारी असोसिएनचे पदाधिकारी
शांतता समितीच्या बैठकीला उपस्थित होते।