मंगलवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता प्रवीण सुर यांनी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी निघालेल्या रॅलीत वरोरा-भद्रावती मतदारसंघात तसेच ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने कार्यकते, महाराष्ट्र सैनिक व महिला उपस्थित होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दुपारी 12 वाजता वरोरा आशीर्वाद मंगल कार्यालय येथे मोठ्या संख्येने प्रवीण सुर यांचे समर्थक गोळा झाले होते. यावेळी शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी शहरात रॅली काढली. ढोलताशाच्या गजरात निघालेली ही रॅली आशीर्वाद मंगल कार्यालयातुन वरोरा मैन मार्केट ते मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयासमोर दाखल झाली. रॅलीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी कडे प्रवीण सुर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रवीण सुर यांनी हिताचे आंदोलने करून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे यामुळे यंदा ठरलंय, वारं फिरलंय असं चित्र दिसायला लागले आहे.
==================================
ग्रामीण भागातील समर्थकांची हजेरी…..
रॅलीमुळे प्रवीण सुर यांचा ग्रामीण भागातील प्रभाव दिसून आला. मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील नागरीक या रॅलीला उपस्थित झाले होते. गेल्या 15 वर्षांपासून प्रवीण सुर यांचे सेवाभावी कार्य सुरु आहे. ते कायमच गोरगरीब जनतेच्या कामासाठी धावून जातात.
==================================