विना मास्क फ़िरणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल
14 दिवस होम आयसोलेट व्यक्ती बाहेर फिरताना आढळ्यास गुन्हा दाखल
शिवशक्ती टाइम्स न्यूज
मालेगाव : कोरोनाविषाणू संसर्गजन्य बाधित व्यक्ती मात्र ज्यांना कोणताही त्रास नाही अशा व्यक्तींना 14 दिवस होम आयसोलेटेड करण्यात आलेले आहे
अशा व्यक्तींनी समाजात बाहेर वावरू नये अशी व्यक्ती समाजात वावरताना आढळून आल्यास त्यांच्यावर माननीय शासन आदेश covid-19 संक्रमित कायदा १८९७ लोकंडावून
आदेशाचे उल्लंघन करीत असल्याचे तसेच शहरातील नागरिकांचा स्वस्थ व जीविताचा विचार न करता शहर व ग्रामीण परिसरात फिरत असल्याचे आढळून आल्यास
त्यांचे विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270 प्रमाणे कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल
या अनुषंगाने 13 मार्च 2019 रोजी पोलीस स्टेशन हद्दीत इसम नामे भिका भिमाजी बच्छाव वय 65 रा. सानेगुरुजी रुग्णालय मालेगाव यास 14 दिवस होम आयसोलेट करण्यात आले होते परंतु सदर इसम शहरातील नागरिकांचे स्वास्थ व जीविताचा विचार न करता कॅम्प पोलिस स्टेशन हद्दीत फिरत असल्याने त्याचे विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून कोवीड केअर सेंटर येथे हलविण्यात आले आहेत तसेच होम क्वारंटाईन व्यक्ती बाहेर फिरतांना मिळून आल्यास गंभीर दखल घेण्यात येईल असेही पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले
महाराष्ट्र शासनाने covid-19 च्या अनुषंगाने दिशानिर्देश जारी केलेले आहे त्याची जनजागृती प्रसार माध्यम, सोशल मीडिया तसेच प्रिंट मीडिया यांच्या माध्यमातून प्रसार करण्यात आलेला आहे. तरीदेखील काही व्यक्ती शासनाने दिलेल्या दिशानिर्देश पालन न करता विना मास्क शहरात फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा व्यक्तींवर पोलिस प्रशासन व मनपा प्रशासन यांचे पथक निर्माण करून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे व जे व्यक्ती निर्बंधांचे पालन करत नाही विना मास्क शहरात फिरतात अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करण्यात आलेला आहे
शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की शहरात कोणीही विना मास्क फिरू नये विना मास्क फ़िरणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.