Home चंद्रपूर  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे ‘ दर्पण दिन ‘ साजरा*

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे ‘ दर्पण दिन ‘ साजरा*

103
*वरोरा* : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, शाखा वरोरातर्फे गांधी चौक येथील मौलाना अबुल कलाम आझाद लायब्ररी येथे मराठीचे आद्य संपादक ‘दर्पण कार ‘ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आठवण म्हणून ‘ दर्पण दिन ‘ साजरा करण्यात आला
यावेळी संघाचे अध्यक्ष बाळू भोयर, सचिव शाहीद अख्तर, मार्गदर्शक मनोज श्रीवास्तव, शाम ठेंगडी, प्रदीप कोहपरे, डॉ. प्रवीण मुधोळकर, प्रवीण गंधारे, राजेंद्र मर्दाने, खेमचंद नेरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या मनोगतात राजेंद्र मर्दाने म्हणाले की, मराठी वृत्तपत्राचे जनक ,आद्य सुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची खरी जन्मतारीख दि. २० फेब्रुवारी १८१२ आहे. त्यांनी केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून ६ जानेवारी १८३२ रोजी ‘ दर्पण ‘ प्रकाशित केले. हे वृत्तपत्र काढून मराठी वृत्तव्यवसायाचा पाया त्यांनी घातला. त्यांचे विचार प्रगमनशील होते. विविध क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्याचे हे महान कार्य पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभा सारखे मार्गदर्शक ठरत आहे.
बाळू भोयर म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर हे आधुनिक महाराष्ट्राचे पहिले समाज सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, इतिहास संशोधक आणि विचारवंत होते. यावेळी त्यांनी आचार्य जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.
सूत्रसंचालन शाम ठेंगडी यांनी केले तर आभार शाहीद अख्तर यांनी मानले.