Home चंद्रपूर  २८ ऑक्टोबरला प्रवीणभाऊ सुर दाखला करणार उमेदवारी अर्ज

२८ ऑक्टोबरला प्रवीणभाऊ सुर दाखला करणार उमेदवारी अर्ज

20

*कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह*- हजारोंची संख्यात राहणार उपस्थिती *

*वरोरा येथील उपविभागीय कार्यालय येथे अर्ज दाखल करणार *

माजरी-वार्ताहार

माजरी- वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रवीणभाऊ सुर येत्या सोमवारी, दि. २८ ऑक्टोबरला हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे.*
वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मनसेचे प्रवीणभाऊ सुर २८ ऑक्टोबरला (सोमवारी) सकाळी ११.०० वाजता वरोरा येथील उपविभागीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारसंघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनसेच जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केले आहे. यावेळी अर्ज भरण्यापूर्वी प्रवीण भाऊ सुर मतदारसंघातील नागरिकांचा आशीर्वाद घेऊन (आशीर्वाद मंगल कार्यालय, वणी नाका, मेन बाजार चौक वरोरा येथुन उपविभागीय कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यासाठी निघणार आहे. जिला परिषद सदस्य असताना आपले जिला परिषद माजरी-पाटाला क्षेत्रामध्ये विवीध विकासकामांच्या माध्यमातून पांदण रस्ता, हायमास्ट लाईट, सार्वजनिक ठिकाणी सिमेंटचे बाक, स्मशानभूमी सुशोभिकरण, रस्ते, नाले, गल्ल्या, सामाजिक इमारती इत्यादी बांधकामाबरोबरच धार्मिक क्षेत्राच्या विकास कामात योगदान देऊन स्थानिक लोकांमध्ये आपला विश्वास नोंदवला आहे. .